लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग जरा थांबा. कारण सलग चार दिवस उसळी घेणाऱ्या सोन्या आणि चांदीच्या दरांनी आज अचानक रिव्हर्स गिअर टाकला आहे. बाजारात अचानक असं काय घडलं की सोन्याचा भाव एकदम घसरला, असा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असेल.
एमसीएक्सवर (MCX) एप्रिल गोल्ड वायदा ०.५० टक्क्यांपेक्षा अधिक घसरून थेट १,६०,७५० रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. सोबतच एप्रिल सिल्वर वायद्यातही मोठी घसरण झाली असून तो २,६४,९७२ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात जोरदार तेजी होती. पण आता गुंतवणूकदारांनी जोरदार नफावसुली सुरू केल्याने बाजारात हा दबाव वाढल्याचे दिसत आहे.








