---Advertisement---

टाटांचा मोठा धमाका! कमी किमतीत सनरूफसह लक्झरी फीचर्स; लाँच केली नवीन पंच फेसलिफ्ट

नवीन गाडी घ्यायचा विचार करताय? आणि बजेट थोडं ‘टाइट’ आहे? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. भारतीय रस्त्यांवर सध्या एसयूव्हीची क्रेझ आहे, आणि त्यात जर टाटाचं नाव असेल तर विषयच संपला. टाटा मोटर्सने पुन्हा एकदा मार्केट हलवून सोडलंय. बहुचर्चित Tata Punch Facelift 2026 अखेर लाँच झाली असून, तिची किंमत ऐकून तुम्हीही खुश व्हाल. अवघ्या ५.५९ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) या गाडीची किंमत सुरू होत आहे.

On: February 24, 2026 6:54 PM
---Advertisement---

नवीन टाटा पंच फेसलिफ्ट 2026 ..

गाडीचा लूक आता अधिक बोल्ड आणि मॉडर्न झालाय. जुन्या मॉडेलपेक्षा नवीन बंपर, कनेक्टेड टेललॅम्प आणि LED Headlamps मुळे गाडीला एक वेगळाच रुबाब आलाय. पण खरी गंमत तर आतमध्ये आहे. आतापर्यंत स्वस्त गाड्यांमध्ये जे फीचर्स मिळत नव्हते, ते टाटाने दिले आहेत. चक्क Voice-Assisted Electric Sunroof, १०.२५ इंचाची टचस्क्रीन, ३६०-डिग्री कॅमेरा आणि व्हेंटिलेटेड सीट्ससारखे फीचर्स यात आहेत.

टाटा म्हणजे सुरक्षा, हे समीकरण इथेही कायम आहे. नवीन पंचमध्ये ६ एअरबॅग्ज आणि ५-स्टार भारत NCAP रेटिंग आहे. पॉवर हवी असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, यात आता नवीन 1.2-litre Turbo Petrol Engine देण्यात आलंय, जे १२० PS ची ताकद देतं.

त्यामुळे जर तुम्ही फॅमिलीसाठी सुरक्षित आणि स्टायलिश गाडी शोधत असाल, तर नवीन पंच शोरूममध्ये जाऊन बघायला काहीच हरकत नाही.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment