खात्यात पैसे येण्याची वाट बघून डोळे थकले असतील ना? तर तुमच्यासाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे! राज्यभरातील लाडक्या बहिणींच्या (Ladki Bahin Yojana) बँक खात्यात अखेर जानेवारी महिन्याचे १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
सोमवारपासून (२३ जानेवारी) अनेक महिलांच्या मोबाईलवर पैसे क्रेडिट झाल्याचे मेसेज धडकत आहेत. त्यामुळे महिला वर्गात सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. महिला व बाल विकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक न्याय विभागाकडून १८ फेब्रुवारीला ९८ कोटींचा निधी प्राप्त झाला होता.
Ladki Bahin Yojana Installment
हा निधी हाती येताच लगेचच या Ladki Bahin Yojana च्या जानेवारीच्या हप्त्याचे वाटप युद्धपातळीवर सुरू झाले आहे. अनेक महिलांचे पैसे अद्याप आलेले नाहीत, त्यामागे एक अतिशय महत्त्वाचं कारण दडलंय.
जुलै २०२४ मध्ये जेव्हा ही महत्त्वकांक्षी योजना सुरू झाली, तेव्हा तब्बल २ कोटी ४६ लाख महिला या योजनेच्या लाभार्थी होत्या. मात्र राज्य सरकारने ई-केवायसी (E-KYC) सक्तीची केल्यामुळे ही संख्या थेट १ कोटी ६० लाखांवर घसरली आहे. म्हणजेच, लाखो बहिणी या योजनेच्या लाभापासून सध्या तरी वंचित राहिल्या आहेत.
जर तुमचेही पैसे अजून आले नसतील, तर घाबरून जाण्याचे कारण नाही. शासनाने ई-केवायसी प्रक्रियेतील चुका दुरुस्त करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपली माहिती अपडेट करून घेणे फायद्याचे ठरेल.
विशेष म्हणजे, जुलै २०२४ पासून ते जानेवारी २०२६ पर्यंत महिलांना आतापर्यंत एकूण १९ हप्त्यांचा लाभ मिळाला आहे. यासोबतच, पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला शेतकऱ्यांना दरमहा ५०० रुपये दिले जात आहेत. त्यामुळे तातडीने तुमची ई-केवायसी तपासा आणि खात्री करा!








